नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समुद्रा पोहण्याची मजा घेत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राहुल गांधी हे मच्छिमाऱ्यांच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घण्यासाठी समुद्रात उडी मारली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनोखा अंदाज चर्चा सध्या रंगत आहेत. केरळातल्या कोल्लममध्ये राहुल गांधी मच्छिमारांसोबत मासे कसे पकडतात हे पाहण्यासाठी समुद्रात गेले होते. मच्छिमार जाळं टाकून मासे पकडत होते. त्यावेळी त्यांनी खोल समुद्रात उडी घेतली हे पाहून राहुल गांधींनीही समुद्रात उडी घेत चक्क मच्छिमारांसोबत १० मिनिटं पोहण्याचा आनंद लुटला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी त्यांनी काही क्षण मच्छिमारांसोबत घालवत मासेमारी बद्दल चर्चा सुद्धा केली. यावेळी राहुल गांधी यांनी खाकीरंगाची लांबपॅन्ट आणि निळा टीशर्ट घातला होता, एएनआयने राहुल गांधींचा हा व्हिडिओ पोस्ट केला. राहुल यांचा हा अनोखा अंदाज सध्या व्हायरल होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी मच्छीमारांसह त्यांच्या बोटीत बसले आणि समुद्रात गेले. त्यांनी बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वाडी तट किनाऱ्यावरूम प्रवास सुरू केला आणि सुमारे एक तास समुद्रात होते.
यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनोखा अंदाज चर्चा सध्या रंगत आहेत.