Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एका महिन्यापासून अंबानींच्या घराची रेकी, स्फोटके भरलेल्या गाडीच्या मूळ मालकाचा लागला शोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एका महिन्यापासून अंबानींच्या घराची रेकी, स्फोटके भरलेल्या गाडीच्या मूळ मालकाचा लागला शोध

Surajya Digital
Last updated: 2021/02/26 at 9:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ काल गुरुवारी एका स्कॉर्पिओत जिलेटिनचा साठा आढळून आला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी अंबानी कुटुंबाला देण्यात आली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या गाडीच्या मूळ मालकाची माहिती समोर आली आहे.

मागील एका महिन्यापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी केली जात होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांना कारमध्ये एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये एक चिठ्ठी देखील सापडली आहे. बॅगवर ‘मुंबई इंडियन्स’ असे लिहिले आहे. चिठ्ठीत लिहिले की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.

या वाहनामध्ये काही बनावट नंबर प्लेट्‌सही आढळल्या आहे. यापैकी एक नंबर प्लेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नावाने रजिस्टर आहे. याप्रकरणी नागपूर कनेक्‍शन समोर आले आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यावर नागपूरच्या कंपनीचे नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मूळ मालकाची माहिती आली समोर

17 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन ठाण्यावरून संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईला येत होते. मात्र, विक्रोळी ऐरोली सिग्नल जंकशनजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर त्यांची स्कॉर्पिओ बंद पडली. त्यानंतर मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओ तिथेच रस्त्याच्या बाजूला उभी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता हिरेन त्यांची गाडी घेण्यासाठी आले तेव्हा ती चोरीस गेली होती.

याबाबत हिरेन यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती. ज्या ठिकाणी गाडी उभी केली होती तिथे सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्या रस्त्यावरील अन्य सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.

ही स्कॉर्पिओ मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील रस्त्यावर 24 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता पार्क करण्यात आली होती. हीच स्कॉर्पिओ त्याच रात्री 12.40 वाजता हाजी अली जंक्‍शन जवळ असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे. गाडी अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये म्हणून चालक गाडीच्या मागच्या दरवाजाने फरार झाला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तैनात केली आहे. सध्या नऊ जणांची चौकशी देखील सुरु आहे.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #Reiki #originalowner #explosive-ladencar #searching #Ambani'shouse, #अंबानींच्या #घराची #रेकी #स्फोटके #गाडीच्या #मूळमालकाचा #शोध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोलकाता : निवडणुकांच्या तारखा जाहीर; ममता भडकल्या
Next Article लिम्का बुक रिकॉर्ड नोंद : सोलापुरात 18 तासात बांधला 25 किमीचा रस्ता, गडकरींकडून कौतुकाची थाप

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?