सूरत : गुजरातच्या सुरतमधून एक अतिशय अमानुष घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या भावासोबत मिळून नवऱ्यासोबत केलेल्या कृत्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेनं स्वतःच्या पतीला दोरीच्या सहाय्यानं टेम्पोच्या मागे बांधलं आहे. यानंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याला फरफटत नेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पती हा वारंवार दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचा असा आरोप आहे. याच कारणामुळे त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीनं भावासोबत मिळून हा संपूर्ण प्रकार केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पत्नीच्या या अमानुष कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
पती दारू पिऊन आल्यानंतर पत्नीनं सर्वात आधी त्याला दोरीनं टेम्पोच्या मागे बांधलं. यानंतर जवळपास एक किलोमीटर त्याला फरफटत नेलं. हा सर्व प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही लोकांनी त्याची सुटका केली. संबंधित व्यक्तीची प्रकृती सध्या गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या पत्नी आणि तिच्या भावाविरोधात कारवाई सुरू केली आहे.