Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात विनामास्क फिरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड, जिल्हा प्रशासनाचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात विनामास्क फिरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड, जिल्हा प्रशासनाचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2021/03/01 at 7:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुध्दची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस. टी.स्टँड,प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी आणि शासकीय दवाखान्याच्या परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द तीव्र कार्यवाहीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जिल्हा आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले की, एस.टी . स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तपासणी कर्मचारी नियुक्त करावेत. मास्क वापरण्यासाठी प्रवाशांना सूचना द्याव्यात. सॅनिटायझरची व्यवस्था करावी, जे नागरिक विनामास्क आढळतील त्यांना एक हजार रुपये दंड करावा. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासह सर्व संबंधित विभागांनी आपआपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करावे. आरोग्य विभागांतील सर्व घटकांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच टेस्टिंग,ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या आधारे काम करावे.

जिल्हा परिषदेच्या वतीने राबवले जाणारे ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव मोहीम’ ग्रामीण भागात प्रभावीपणाने राबवावी. ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना स्थानिक स्तरावरच संस्थात्मक विलगीकरण करावे. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी दिल्या.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रवींद्र आवळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #District #order #mask #1thousandrupye #pennalti, #सोलापुरात #विनामास्क #फिरणाऱ्यांना #हजाररुपयेदंड #जिल्हाप्रशासनाचे #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दादांच्या पोटातले ओठांवर, हा तर जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न
Next Article काँग्रेस नेते राहुल गांधींचे ९ सेकंदांत १३ पुशअप्स

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?