Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रविवारी झालेली आरोग्यभरती परीक्षा होऊ शकते रद्द, अजित पवारांनी अधिवेशनात दिले मोठे संकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रविवारी झालेली आरोग्यभरती परीक्षा होऊ शकते रद्द, अजित पवारांनी अधिवेशनात दिले मोठे संकेत

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 8:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : सामूहिक कॉपी, पेपर फुटणे, अर्धा ते दीड तास पेपर उशिरा मिळणे यासह अन्य कारणांनी रविवारी झालेली आरोग्य विभागाची परीक्षा वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची झालेली भरती रद्द होऊ शकते असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानपरिषदेत दिले.

आरोग्य विभागात रिक्त असलेली गट क च्या पदांची सरळसेवा भरतीसाठी दोन वर्षापूर्वी अर्ज भरून घेण्यात आले होते. यासंदर्भातील पुरावे तपासून गरज पडली तर तथ्य असेल तर परीक्षा रद्द करून त्या घेतल्या जातील. सोमवारी (ता.८) याचाही निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रविवारी (ता. २८) एकाच दिवशी सकाळच्या सत्रात १४ संवर्गाची तर दुपारच्या सत्रात ४० संवर्गाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १ लाख ३३ हजार उमेदवारांनी हजेरी लावली होती. आरोग्य विभागाने ही भरती खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेतली.

अजित पवार म्हणाले, ”आरोग्य विभागातील भरतीबाबतची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून माझ्याही कानावर आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला, पण तो कोरोनाने आजारी असल्याने ते सोमवारी (ता. ८) सभागृहात घेणार आहे. विनायक मेटे यांनी सभागृहात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तथ्य आढळले तर त्यात राज्य सरकार हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर पुरावे समोर आले तर या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. पण याचा अंतिम निर्णय सोमवारी घेण्यात येईल.”

* परीक्षेत झाले हे प्रकार

औरंगाबाद, नागपूर येथे परीक्षेपूर्वीच पेपर फुटेल, इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करून परीक्षेत उत्तरे लिहिण्यात आली. आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षा असतानाही बाहेरचे प्रश्‍न विचारले गेले. बैठक व्यवस्था चुकीची केल्याने मास कॉपीचे प्रकार घडले आहेत. विद्यार्थ्यांनी सुमारे दीड तास उशिरा पेपर मिळाला, असुविधेबद्दल विचारणा करणाऱ्या उमेदवारांना मारहाण करण्यात आली, तसेच मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्धी प्रश्‍नपत्रिका इंग्रजीतून देण्यात आली. बैठक व्यवस्थेतील गोंधळ, अपारदर्शक कारभार संतप्त उमेदवारांना रोखण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची नामुष्की ओढवली.

या प्रकरणी काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. परीक्षेतील गोंधळामुळे गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर उमेदवारांनी टीकेची झोड उठवली होती. सोशल मिडियवरून याविरोधात मोहीम सुरू झाली होती. याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले होते. आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उत्तर दिले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Healtdepartment #exam #cancell-desion #ajitpawar, #आरोग्यभरती #रद्द #संकेत #अधिवेशन #अजितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गळ्यात वीज मीटर, वीजपंप अडकावून आंदोलन; भाजप आक्रमक
Next Article कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचवले, 11 जणांना अटक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?