Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आसाम विधानसभा निवडणूक : प्रियांका गांधींनी चहाच्या मळ्यात खुडली पानं
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

आसाम विधानसभा निवडणूक : प्रियांका गांधींनी चहाच्या मळ्यात खुडली पानं

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 12:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गुवाहाटी : चहाचा मळा व कामगार आसामच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त आसाममध्ये प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी सधारु टी स्टेट येथे चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवाद साधत पारंपारिक पद्धतीने चहाची पाने खुडली. हे फोटो व्हायरल झाले आहेत. 126 जागांसाठी 3 टप्प्यांत मतदान होणार आहे. निकाल 2 मे ला जाहीर होईल.

आगामी विधानसभा निवडणूकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आसाममध्येही निवडणूकांच्या प्रचाराचे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आसाम दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी आसाममधील ‘साधारु टी स्टेट’ या ठिकाणी भेट दिली आहे. त्यांनी चहाच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांची भेट घेतली. त्यानंतर चहाच्या मळ्य़ात काम करणाऱ्य़ा महिलांसोबत चहाची पानेही तोडली. आसाममधील प्रत्येक निवडणूकीमध्ये येथील चहाच्या मळ्यांध्ये काम करणारे मजूर राजकिय पक्षांच्या मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आसाममधील तेजपूरमध्ये सभा घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आसामच्या दौऱ्यात ४९ वर्षीय प्रियांका गांधी यांनी चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लखीमपूर भागाला भेट दिली. त्यांनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. दर निवडणुकीला येथील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात.आज प्रियंका यांची तेजपूरमध्ये एक प्रचारसभाही होणार आहे.

प्रियंका गांधी यांनी नीलाचल हिल्स येथील शक्तीपीठाला भेट दिली. य़ावेळेस त्या म्हणाल्या, ”बऱ्याच कालावधीपासून मला मंदीराला भेट द्यायची होती.आज अखेर माझी इच्छा पूर्ण झाली. मी माझ्या स्वता:च्या कुटुंबाबरोबर आसामी लोकांच्या भल्य़ासाठी प्रार्थना केली आहे,” असं त्यांनी म्हटलं. तसेच विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर, प्रियंका गांधी पत्रकांराना राजकारणाच्या बाबतीत नंतर कधीतरी बोलू असं म्हणाल्या. ”मी या ठिकाणी देवाचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. देवाने मला अनेक गोष्टी दिल्या आहेत” अंस यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या.

आसामची विधानसभा सदस्य संख्या १२६ आहे. २७ मार्च, १ एप्रिल, आणि ६ एप्रिल अशा तीन टप्प्यांत आसाममध्ये मतदान होणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Assam #AssemblyElection #PriyankaGandhi #leaves #tea #garden, #आसाम #विधानसभानिवडणूक #प्रियांकागांधींनी #चहाच्यामळ्यात #खुडलीपानं
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सेक्स स्कॅडल : आणखी एका मंत्र्याची सीडी आली समोर, तक्रार दाखल
Next Article कारवाईने बॉलिवूडमध्ये खळबळ, अनुराग कश्यप व तापसी पन्नूच्या घरावर धाड

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?