सातारा : पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेणारी पाइपलाइन फोडली आहे. साता-याच्या फलटण तालुक्यातील सासवड येथे ही घटना घडली. यात दोन हजार लिटर पेट्रोल लंपास केले आहे. तर हजारो लिटर जमिनीत मुरल्याने या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील 223 किलोमीटरच्या पाइपलाइनवर अज्ञातांनी हा डल्ला मारला. त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पेट्रोल महाग झाल्याच्या टेंन्शमध्ये अज्ञातांनी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची पेट्रोल वाहून नेणारी पाइपलाइन फोडली आहे. सातारा जिह्यातील फलटण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे हजारो लीटर पेट्रोल वाया गेल आहे. ही पाइपलाइन फोडल्याने शेतात पेट्रोल घुसले असून विहिरी देखील पेट्रोलने भरल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई-पुणे-सोलापूर अशी जाणारी 223 किलोमीटरची उच्चदाब पाईपलाईन चोरट्यांनी फोडली आहे. साताऱ्यातील सासवड गावाजवळ या पाईपलाईनला मोठं भगदाड पाडण्यात आलं आहे. ही पाईपलाईन फोडल्यानंतर वेळीच अलार्म वाजल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
या पाईपलाईन मधून हजारो लिटर पेट्रोल वाया गेले आहे. शेतात पेट्रोल घुसल्याने पीकांचे अतोनात नुकसान झाले आले. शिवाय विहीरीत हे पेट्रोल मिसळल्याने विहीरीतील पाणी दूषित झाले आहे. यामुळे मासे, बेडूक, साप असे जीव मृत्यूमुखी पडले आहेत.
याप्रकरणी पेट्रोल कंपनीने लोणंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल चोरीच्या उद्देशानेच पाइपलाइप फोडल्याची प्राथमिक माहिती आहे.