Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदाराची दोन तास चौकशी, डोक्याला हात लावत राजकारणात पडल्याचा व्यक्त केला पश्चात्ताप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

खासदाराची दोन तास चौकशी, डोक्याला हात लावत राजकारणात पडल्याचा व्यक्त केला पश्चात्ताप

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 12:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याप्रकरणी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची शहर पोलिसांनी तब्बल दोन तास चौकशी केली. चौकशीमध्ये खासदारांनी काय जबाब दिला, हे समजू शकले नसले तरी, “का म्हणून राजकारणात पडलो? माझं धार्मिक कार्य बरं होतं, राजकारणापेक्षा मठच बरा होता’, असे म्हणत डोक्याला हात लावत राजकारणात पडल्याचा पश्चात्ताप व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पोलिस आयुक्तालयात काल बुधवारी सकाळी दोन तास त्यांची गुन्हे शाखेने कसून चौकशी केली. मात्र चौकशीतून काय निष्पन्न झाले, हे अजून समजू शकले नाही. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता.

* बनावट नोंदी झाल्याचे आले निदर्शनास

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी त्यांचा अनुसूचित जातीमधील दाखला बेडा जंगम असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राला विनायक कंदकोरे, प्रकाश गायकवाड, मऱ्याप्पा मुळे यांनी हरकत घेतली होती. मात्र ही हरकत फेटाळण्यात आली होती. तेव्हा जयसिद्धेश्वर महास्वामी हे निवडून आले. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड व मूळ तक्रारदारांनी सामाजिक न्याय विभागातील जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जात पडताळणी समितीने चौकशी केली असता त्यात उमरगा आणि अक्कलकोट तहसील कार्यालयात बनावट नोंदी झाल्याचे निदर्शनास आले.

* न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

जात पडताळणी समितीने तत्कालीन तहसीलदारांना जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळवले व त्याबद्दल तक्रार देण्याचे आदेश केले. तत्कालीन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी याबाबत न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने ही तक्रार सदर बझार पोलिस ठाण्यात पाठवून त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशावरून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, अक्कलकोट आणि उमरगा येथील तहसील कार्यालयातील अज्ञात प्रशासकीय अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यावर संशय बळावला आणि त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

* आता चौकशीसाठी माराव्या लागणार चक्करा

पुन्हा एकदा यावे लागेल चौकशीला भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दाखला तयार करून दिल्याच्या संशयातून शिवसिद्ध बुळ्ळा याला यापूर्वीच अटक झाली आहे. पहिल्या टप्प्यात महास्वामी यांची प्राथमिक चौकशी गुन्हे शाखेने केली आहे. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे स्पष्टपणे न मिळाल्याने गरज पडल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अहवाल न्यायालयात ठेवला जाणार आहे, असेही सांगण्यात आले. बुळ्ळा याने अनेकांना खोटे दाखले दिल्याचा संशय आहे, परंतु डॉ. महास्वामी यांच्यापुरताच गुन्हा असल्याने त्याअनुषंगाने तपास सुरू आहे, असेही सूत्रांनी या वेळी स्पष्ट केले.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

TAGGED: #interrogation #MP #touched #head #expressed #remorse #falling #politics, #खासदाराची #दोनतासचौकशी #डोक्यालाहात #राजकारणात #पडल्याचा #पश्चात्ताप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानांचे भाषण कोण लिहते, किती खर्च येतो? पीएमओ कार्यालयाकडून दिले उत्तर
Next Article युवराज सिंगच्या विक्रमाशी पोलार्डची बरोबरी, सहा चेंडूत सहा षटकार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?