वेळापूर : जमावबंदीचा मोडून बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा डीजे लावून धूमधडाक्यात कार्यक्रम साजरा केला. विशेष म्हणजे आदेशाचे पालन आणि अंमलबजावणी करणा-या पोलिसांनीच हे कृत्य केले आहे. कोरोनाचे सर्व नियब धाब्यावर ठेवून डीजेच्या तालावर, गर्दी करीत वाढदिवस साजरा केला. आता यात पोलिसांनीचा पोलिसावर गुन्हा दाखल केलाय.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या जमावबंदी व कोरोना आदेशाचे पालन न करता वेळापूर (ता.माळशिरस) येथील पालखी मैदानावरती डीजे लावून वाढदिवस साजरा केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यात वेळापूर स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव, पोलीस नाईक विनोद साठे यांच्यासह ७ व इतर २० ते २५ लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वेळापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
२ मार्च रोजी रात्री ७.३० ते ९.०० या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज चौकातील पालखी मैदान (वेळापूर ) येथे पोलीस नाईक विनोद साठे व त्यांचे हितसंबंधी मित्रांनी मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा केला. यात जमावबंदी आदेशाचे तसेच कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले. बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळता वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करून डीजे लावून त्यासमोर नाचून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढविण्याची हयगयीची कृती केली अशा, आशयाची फिर्याद पोलिस. कॉन्स्टेबल महेश पोरे यांनी दिली.
“सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशाचे जनतेने तंतोतंत पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टसिंग ठेवावे, कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, अशी आमची सर्वांना विनंती आहे”
भगवान खारतोडे – पोलीस निरीक्षक, वेळापूर