मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस असून या अधिवेशनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराच्या मुद्द्यांवरून भाजपाला चिमटा काढला आहे. एका व्यक्तीनं आपली भेट घेतली आणि राम मंदिरासाठी निधी देण्याबाबत आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्याचे नाना पटोले यांनी सभागृहात सांगितले होते.
पुढे याच मुद्द्यावरून बोलताना पटोलें म्हणाले की, राम मंदिर उभारणीसाठी कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत अशी विचारणा पटोले यांनी केली होती. प्रभू श्रीरामाने यांना कंत्रात दिले आहे का ? असा सवाल विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. यावरून भाजपाच्या आमदारांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत हिंमत असेल तर राम मंदिरावर चर्चा लावा असे आव्हान महाविकास आघाडी सरकारला दिले होते. त्यामुळे आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
* 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं?
डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्यानेही राम मंदिराच्या नावावर जमा केलेल्या निधीचा उपयोग दारू पिण्यासाठी केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता.