Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘परीक्षा संपेपर्यंत थांबा’ म्हटल्यावरही सोलापुरातील मुलींच्या आयटीआयची वीज तोडली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘परीक्षा संपेपर्यंत थांबा’ म्हटल्यावरही सोलापुरातील मुलींच्या आयटीआयची वीज तोडली

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 7:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : थकीत वीजबिलापोटी कोणतीही वीज खंडीत करु नका, असे राज्य सरकार बजावत असतानाही सोलापुरातील एकमेव मुलीच्या आयटीआयची वीज खंडीत केली आहे. त्यामुळे तेथे जनरेटर बसवून मुलींची परीक्षा घेतली जात आहे.

मागील काही दिवसांपासून विजेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही, अशा ग्राहकांची वीज कापली जात आहे. अशाप्रकारे लॉकडाऊन काळातील वीज बिल न भरल्यामुळे महावितरणने डफरीन चौकातील मुलींच्या आयटीआय कॉलेजचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे सात दिवसांपासून महाविद्यालय अंधारात आहे. जनरेटर मागवून विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वीज महामंडळाने नोटीस देऊनही बिल न भरल्यामुळे २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संस्थेचे वीज कट करण्यासाठी संस्थेत आले. तेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली. ‘साहेब, परीक्षा सुरू आहेत तुम्ही आत जाऊन पाहा. सायंकाळी ४ वाजता परीक्षा संपतील तोपर्यंत थांबा. नाहीतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल’, अशी विनवणी केली.

* जिल्ह्यात मुलींसाठी एकमेव आयटीआय

जिल्ह्यात मुलींसाठी एकमेव औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेचे अनुदान न आल्यामुळे लॉकडाऊन काळातील ४ लाख ६५ हजार रुपयांचे विजेचे बिल संस्थेने भरलेले नाही. यामुळे महावितरणने संस्थेला नोटीस पाठवली. पण नोटीस पाठवूनही संस्थेने बिल न भरल्यामुळे महावितरणने २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी वीज कापली. यामुळे महाविद्यालय अंधारमय झाले आहे. यामुळे परीक्षेच्या दिवशी तेथील कर्मचाऱ्यांनी जनरेटर मागवून परीक्षा घेतली. उर्वरित परीक्षेसाठी विजापूर रोडवरील मुलांच्या आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना पाठवून तेथून परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Solapur #exam #girls #ITI #electricity #broken, #परीक्षा #मुलींच्या #आयटीआयची #वीज #तोडली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोठी घोषणा; शिवसेना बंगालची निवडणूक लढणार नाही, ममतांना साथ देणार
Next Article संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?