Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन, अर्धशतकाहून अधिक काळ गाजवला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन, अर्धशतकाहून अधिक काळ गाजवला

Surajya Digital
Last updated: 2021/03/06 at 10:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मोघे यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता शंतनु मोघे आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर वाडी येथे तर पुढील शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झालं.

शालेय जीवनातच ते नाटकांकडे वळले. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्‌‍सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.
आपल्या नाट्यप्रवासावर त्यांनी नाट्यरंगी रंगलो हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा ही आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

* मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
– काशीनाथ घाणेकर पुरस्कार (२०१०)
– केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
अखिल भारतीय मराठी
– नाट्यपरिषदेचा पुरस्कार (२०१०)
– सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
गदिमा पुरस्कार (२०१३)
– महाराष्ट्र सरकारचा २०१४ चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
– महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #actor #ShrikantMoghe's #Death #demise #lasted #halfcentury, #ज्येष्ठअभिनेते #श्रीकांतमोघे #निधन #अर्धशतकाहून #अधिककाळ #गाजवला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
Next Article नॅशनल क्रश रश्मिकाची ‘मिशन मजनू’तून बॉलिवूडमध्ये एंट्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?