Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अबब! हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

अबब! हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली

Surajya Digital
Last updated: 2021/03/07 at 9:57 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

रत्नागिरी / मुंबई : आंब्याचा मोसम सुरु झाला असून सध्या बाजारपेठेत अत्यंत मर्यादित प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळत आहे. नुकत्याच मुंबईच्या अंधेरीत एका कार्यक्रमात हापूसच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळाला. राजापूरमधील बाबू अवसरे यांच्या 5 डझन आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा भाव मिळाला आहे. हापूसच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती.

उन्हाळा सुरु झाल्यानंतर सुर्याचा दाह अनेकांच्या डोक्यात हा उन्हाळा संपायचा तरी कधी अशा कैक विचारांचा काहूर माजवतो तसाच काहूर आणखी एका गोष्टीमुळंही पाहायला मिळतो. पण, हा काहूर मात्र हवाहवासा असतो. कारण, सर्वांनाच या मोसमात प्रतीक्षा लागून राहिलेली असते ती म्हणजे फळांच्या राजाची, अर्थात हापूस आंब्याची.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पहिलं फळ बाजारात येण्यापासून ते अगदी या फळाची विक्री, दरांमध्ये होणारे चढउतार या साऱ्यावरच अनेकजण लक्ष ठेवून असतात. कारण, हा फळांचा राजा आपल्या घरी कधी येतो, याचीच उत्सुकताही सर्वांना लागलेली असते. याच साऱ्या उत्सुकतेच्या वातावरणात हापूस आंब्यानं दरांचा एक वेगळाच विक्रम रचला आहे.

राजापूरमधील एका शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.

* आजवरचा सर्वात मोठा विक्रम

कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. जवळपास मागील 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे. त्यामुळं आता येत्या काळात आंब्याच्या दरांकडे विक्रेते आणि खरेदीदारांचं बारीक लक्ष असणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Hapus #sold #5dozenboxes #mangoes #Rs1lakh, #हापूसआंब्याची #5डझनचीपेटी #1लाखरुपयांना #विकली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नॅशनल क्रश रश्मिकाची ‘मिशन मजनू’तून बॉलिवूडमध्ये एंट्री
Next Article स्विस बॅडमिंटन ओपन फायनलमध्ये सिंधूचा प्रवेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?