मुंबई : खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येविषयी त्यांचा मुलगा अभिनव डेलकरने धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्या वडिलांनी हे पाऊल उचलले त्याला केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल कारणीभूत आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं. जर इतक्या मजबूत माणसाला हे पाऊल उचलावं लागलं तर समजा किती पातळीपर्यंत त्यांना मानसिक त्रासाला समोर जावं लागलं होतं, असं अभिनवने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी करणाऱ्या भाजपला कोंडीत पकडण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी मंगळवारीच विधानसभेत डेलकर आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. २२ फेब्रुवारी रोजी जी घटना घडली होती, त्या घटनेसंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो, असे सांगत आपल्या वडिलांच्या आत्महत्येला प्रफुल्ल खेडा पटेल जबाबदार आहेत, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* महाराष्ट्र सरकारवर विश्वास
आम्हाला महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर विश्वास आहे की, ते आम्हाला न्याय मिळवून देतील, असेही त्यांच्या मुलाने म्हटले आहे. तर सातवेळा खासदार असलेल्या व्यक्तीला आत्महत्या करावी लागते, यावरूनच कुठल्या पातळीपर्यंत त्यांना त्रास दिला जात होता, हे लक्षात येते असेही त्यांनी म्हटले आहे. दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तेथील सगळे प्रशासन प्रशासकाच्या हातात असतं. त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारे माझ्या वडिलांना त्रास दिला, असा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.