मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याचे सांगत नाईक कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी मनसुख हिरन प्रकरणात सरकारला कोंडीत पकडून संपूर्ण विधानसभा हादरवून सोडली. त्याच प्रमाणे अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी अशी भूमिका का घेतली नाही?, फडणवीसांना गुप्तचर यंत्रणांकडून सीडीआर मिळतो मग तसा आम्हाला का मिळाला नाही?, असे प्रश्नावर प्रश्न नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून अन्वय नाईक प्रकरणी होत असलेल्या आरोपांना आता अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलगी आज्ञा नाईक पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फकीर ऐरावला जामीन दिलेला आहे. मात्र फडणवीसांना त्यांची निर्दोष मुक्तता केली असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे असा आरोप आज्ञा नाईक यांनी लगावला होता.
अन्वय नाईक यांच्या प्रकरणावरून लावण्यात आलेल्या आरोपावरून गुरुवारी पाटकर परिषेद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भारीत्या जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेतला होता.यावेळी या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले.
एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. मात्र, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भाजपने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.