बंगळुरु : ऑर्डर नाकारणाच्या तरूणीला मारहाण करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली. हितेशा चंद्राणी (बंगळुरू) असे मारहाण झालेल्या तरूणीचे नाव आहे. ऑर्डर रद्द केलीय. कंफर्मेशनची वाट पाहतेय, असे हितेशाने म्हटले. यानंतर डिलिव्हरी बॉय भडकला. त्याने ऑर्डर रद्द करण्यास मनाई केली. मग त्याने घरात घुसून हितेशाला मारहाण केली. याप्रकरणी माफी मागून तिच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे झोमॅटोने म्हटले.
खाद्यपदार्थांची ऑर्डर कॅन्सल केल्याने महिलेचे नाक फोडणाऱ्या झोमॅटो बॉयला अखेर अटक करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये हा प्रकार घडला असून पीडित महिलेचे एक व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फरार झोमॅटो बॉयला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी कंपनीने देखील माफी मागितली आहे.
दरम्यान, महिलाच्या आरोपांवर झोमॅटो याबाबात प्रतिक्रिया दिली असून कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली. स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क करून पोलिसांना संपूर्ण सहाय्य करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून त्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंगळुरू येथील रहिवासी आणि व्यवसायाने कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणी या महिलेने बुधवारी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये महिलेने ऑर्डर कॅन्सल केल्याने झोमॅटो बॉयने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. व्हिडीओमध्ये महिलेच्या नाकातून रक्त येतानाही स्पष्ट दिसत होते.
* नेमके प्रकरण काय, कसे घडले ?
पीडित महिलेने झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ऑर्डरला उशीर होत असल्याने पीडितेने कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन केला आणि ऑर्डर रद्द केली. कस्टमर केअरशी बोलत असतानाच डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला. मात्र महिलेने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. या दरम्यान महिलेची डिलिव्हरी बॉयसोबत बाचाबाची झाली.
महिला ऑर्डर स्वीकारत नसतानाही डिलिव्हरी बॉय घरात घुसून बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पीडितेने त्याला रोखले. यामुळे रागावलेल्या डिलिव्हरी बॉयने ‘मी तुझा नोकर आहे का?’ असे म्हणत महिलेच्या नाकावर जोराचा ठोसा दिला आणि फरार झाला.
हा सर्व प्रकार घडला तेव्हा महिला घरी एकटीच होती, त्यामुळे तिच्या मदतीलाही कोणी येऊ शकले नाही. महिलेने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला आणि रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. तसेच बंगळुरू पोलिसांकडे जाऊन रितसर तक्रारही नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.