Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केले जाहीर, एमपीएससीची परीक्षा अखेर 21 मार्चला होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

केले जाहीर, एमपीएससीची परीक्षा अखेर 21 मार्चला होणार

Surajya Digital
Last updated: 2021/03/12 at 12:22 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : एमपीएससीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा अखेर 21 मार्चला होणार आहे. याविषयी एका परिपत्रकाद्वारे आज माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा आधी 14 मार्चला होणार होती. मात्र ती अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसातच ही परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी एमपीएससी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज एमपीएससीने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती. सलग चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचं कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचं काल गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं होतं.

कोरोनामुळे एमपीएससीची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात परीक्षा होतील, हे मी वचन देतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी ठेवावी. वयाची मर्यादा आडवी येणार नाही. उद्याच परीक्षेची नवीन तारीख जाहीर होईल. कोरोनामुळे नाईलाजाने परीक्षा थोडी पुढे ढकलावी लागत आहे. उमेदवारांना होणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी म्हटले.

मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Announced #MPSC #exam #finally #held March21, #जाहीर #एमपीएससीची #परीक्षा #21मार्चला #होणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवले, आमदार पडळकरांना घेतले ताब्यात
Next Article अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?