Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मिथाली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

मिथाली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण

Surajya Digital
Last updated: 2021/03/12 at 7:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या महिला संघाची कर्णधार मिथाली राज हिने आज शुक्रवारी नवा किर्तीमान आपल्या नावे केला. मिथाली राज हिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण झाल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारी मिथाली हिंदुस्थानची पहिली तर जगातील दुसरी महिला खेळाडू बनली आहे.

शुक्रवारी लखनौमध्ये हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा एक दिवसीय सामना रंगला. या लढतीत 35 वी धाव घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिथालीच्या 10 हजार धावा पूर्ण झाल्या. हा कारनामा केल्यानंतर ती जास्त वेळ मैदानावर टिकू शकली नाही आणि 36 धावांवर बाद झाली.

मिथाली राज हिच्या आधी इंग्लंडच्या चार्लेट एडवर्डस हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एडवर्डस हिच्या नावावर 10, 273 धावांची नोंद आहे. तिच्या पुढे जाण्यासाठी मिथालीला आणखी 273 धावांची गरज असून असे झाल्यास सर्वाधिक धावांचा विक्रम तिच्या नावावर जमा होईल.

मिथाली राज हिने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 212 लढतीत 6974 धावा केल्या आहेत. तर 89 टी-20 लढतीत तिच्या नावावर 2364 धावांची नोंद असून 10 कसोटीत 663 धावाही तिने केल्या आहेत. तिने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 75 अर्धशतक आणि 8 शतक ठोकली आहेत. यातील 54 अर्धशतक आणि 7 शतक एक दिवसीय क्रिकेटमध्ये ठोकलेली आहेत. कसोटीमध्ये तिच्या नावावर 214 धावांची खेळी आहे.

What a champion cricketer! 👏👏

First Indian woman batter to score 10K international runs. 🔝 👍

Take a bow, @M_Raj03! 🙌🙌@Paytm #INDWvSAW #TeamIndia pic.twitter.com/6qWvYOY9gC

— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2021

दरम्यान, बीसीसीआयने या दमदार कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #MithaliRaj #completes #10000runs #international #cricket, #मिथालीराज #आंतरराष्ट्रीय #क्रिकेटमध्ये #10हजारधावा #पूर्ण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘बॉम्बे बेगम’ वेबसीरिज वादात, बालहक्क आयोगाची नोटीस
Next Article साहित्य अकादमी पुरस्कार – 2020 ची घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?