कोलकाता : नंदीग्राम मधील प्रचारावेळी जखमी झाल्यानंतर चार दिवसांनंतर आज प्रथमच पश्चिम बंगालच्या प्रमुख ममता बॅनर्जी या तेथील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्या. त्यांच्या पायाला मोठी जखमी झाली असल्याने त्या व्हील चेअरवरून कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या रोड शो निमीत्त तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शहरात त्यांचा डॉटर ऑफ बंगाल असा उल्लेख करणारी पोस्टर्स ठिकठिकाणी लावली होती.
ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमधून आपल्या समर्थकांसाठी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, ‘येत्या दोन ते तीन दिवसात मी प्रचारात सामिल होण्याची आशा आहे. जखम कायम राहू शकते, पण तरीही मी मॅनेज करेन. मी कोणतीही मीटिंग ड्रॉप करणार नाही. मला काही दिवस व्हिलचेअरची मदत घेण्याची आवश्यकता पडू शकते. मला तुमचा पाठिंबा हवा आहे.’
ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमधील बेडमधूनही निवडणुकीच्या प्रचारात लवकरात लवकर परत येण्याची आशा व्यक्त केली होती. त्यानंतर त्या आज मैदानात उतरल्या आहेत. ममता यांच्या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवाय ममतांसोबत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. एएनआय आय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यांच्या या पाच किमी लांबीच्या रोड शोला स्थानिक नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रचाराला निघण्यापूर्वीे त्यांनी ट्विटरवर जो संदेश प्रसारीत केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही अत्यंत धैर्याने हा लढा सुरूच ठेवणार आहोत. मला अजूनही जखमांच्या वेदना होत आहेत, पण लोकांच्या वेदना माझ्यासाठी अधिक महत्वाच्या आहेत.
* निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणावर ममता बॅनर्जींचे उत्तर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवरील हल्ल्याचा कोणताही पुरावा नाही. ही एक दुर्घटना होती, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. यावर ममता म्हणाल्या की ‘आम्ही आमचा लढा जोमाने सुरुच ठेवू. मी अजूनही वेदनेत आहे. पण मला माझ्या लोकांच्या वेदना अधिक जाणवत आहेत. आपल्या आदरणीय मातीचे संरक्षण करण्याच्या या लढ्यात आपण खूप सोसले आहे. खूप सोसणारही आहोत. पण, आपण भ्याडांसमोर आपले गुडघे टेकणार नाही!’.