पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘शेतकरी हृदयसम्राट’ असा उल्लेख केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांना नेटकऱ्यांनी चांगलच सुनावलं आहे. झालं असं की, काल फडणवीस पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचं पुणे विमानतळावर स्वागत करण्यासाठी पडळकर देखील हजर झाले होते. त्यांचं स्वागत केल्याचं ट्विट पडळकरांच्या ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलं होतं.
शेतकऱ्यांचे ह्रदयसम्राट 😂😂😂😂😂😂😂😂.
मस्त जोक था आहे भेज…— आशीष माळी (@Garjana206) March 14, 2021
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सद्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केल्यापासून ते पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनपर्यंत गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे टार्गेट देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘पुणे विमानतळ येथे आज गोरगरीब, उपेक्षित, वंचित, युवक, कष्टकरी ,शेतकऱ्यांचे हृदयसम्राट मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सोबत सांगली जि.प.उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे,सचिन देसाई उपस्थित होते.’ असं हे ट्विट आहे. मात्र, शेतकऱ्यांचे हृदयसम्राट असा उल्लेख केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलचं ट्रोल केलं आहे.
टेक्स्ट लिमिटला जागा शिल्लक होती राव " तरूणाईच्या गळ्यातील ताईत, सर्वसमावेशक, भाजपचा बुलंद आवाज " हे पण मावलं असतं !
— Faijal Khan (@faijalkhantroll) March 14, 2021