Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप नगरसेविकेचे पद रद्द; भाजपात माजली खळबळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भाजप नगरसेविकेचे पद रद्द; भाजपात माजली खळबळ

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 6:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : महापालिकेतील भाजपच्या प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तीन अपत्ये असल्याची तक्रार त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड.उमा पारसेकर यांनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजुना प्रभुदेसाई यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करीत उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती ऍड. अजित आळंगे यांनी दिली.

महापालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये प्रभाग क्र. 26 (ब) मधून राजश्री चव्हाण यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे उमेदवार ऍड. उमा पारसेकर यांचा चार मतांनी पराभव केला. मात्र, चव्हाण यांना तीन अपत्य असून 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्याचे सांगत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी पारसेकर यांनी ऍड. अजित आळंगे यांच्या माध्यमातून सोलापूरच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याठिकाणी 2018 मध्ये दिवाणी न्यायालयाने चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. चव्हाण यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात तीन अपत्ये असल्याचे कबूल केल्याचे ऍड. आळंगे यांनी न्यायालयास सांगितले.

त्यांनी तीन अपत्ये नसल्याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आणलेला नाही, असेही निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने चव्हाण यांच्याविरोधात निकाल दिला. दरम्यान, चव्हाण यांच्यातर्फे ऍड. अशोक ताजणे हे काम पाहत असून त्यांच्या विनंतीवरून न्यायालयाने चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिल्याचे सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #BJP #corporator's #post #canceled #Former #agitation #BJP, #भाजप #नगरसेविकेचे #पद #रद्द #भाजपात #माजली #खळबळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
Next Article मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार; आरोपी म्हणतो तो गुन्हा कसा ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?