Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शहराच्या झोपडपट्टीभागात चालत होता कुंटणखाना; दोघा महिलांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

शहराच्या झोपडपट्टीभागात चालत होता कुंटणखाना; दोघा महिलांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 10:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : शहरातील मदर इंडिया झोपडपट्टी भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात कुंटणखाना चालवणाऱ्या दोघा महिलेसह चार पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

उषा मुकेश चोपडे (वय-६०,रा.मदर इंडिया झोपडपट्टी हुडको कॉलनी नंबर ३,सोलापूर) अनिता सुधीर गवळी (वय-५६,रा.मदर इंडिया झोपडपट्टी,कॉलनी नंबर ३,सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मदर इंडिया झोपडपट्टी घर नं ७, हुडको कॉलनी नं. ३ सोलापूर या ठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याचे खात्रीशीर बातमी पोलिसांना सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मिळाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लगेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकण्याकरिता सापळा लावून बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करून छापा टाकला. या छाप्यात उषा चोपडे व अनिता गवळी हे चार पीडित महिलांना स्वतःच्या घरात बोलावून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाढत होत्या. त्यांची शारीरिक पिळवणूक करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून हा व्यवसाय करवून घेत होत्या. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे हे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापू बांगर,साहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कडील पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षिरसागर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बंडगर,सुवर्णा काळे,पोलीस नाईक इनामदार,महादेव बंडगर,मंडलिक, भुजबळ व गोरे आदींनी पार पाडली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #brothel #running #slums #city #Twowomen #arrested, #शहराच्या #झोपडपट्टीभागात #कुंटणखाना #दोघामहिलांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जनता सहकारी बँकेवर पुन्हा परिवार पॅनलचेच वर्चस्व
Next Article मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?