Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तृणमूल काँग्रेससाठी प्रचार करणे टाळा, शरद पवारांना पत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

तृणमूल काँग्रेससाठी प्रचार करणे टाळा, शरद पवारांना पत्र

Surajya Digital
Last updated: 2021/03/18 at 6:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : मोदी सरकारला सक्षम विरोधक म्हणून नवा पर्याय (अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच) निर्माण करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरु केल्याचे सध्या संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगाल, केरळसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने केंद्रात सोबत असलेल्या पक्षांना बगल देत त्यांच्या विरोधातच दुसऱ्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी केली आहे.

यामुळे आता काँग्रेस वगळून साऱ्या विरोधकांना एकाच मंचावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसमोर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव हे तृणमूलच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामिल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षानं ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असे विधान पवारांनी केले होते. यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असे आवाहन त्यांनी केलंय. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा असे ते म्हणालेत.

देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे केवळ बंगालमध्ये पवार यांना काँग्रेसविरोधात म्हणजेच ममतांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागणार आहे. जेणेकरून काँग्रेसचे मतदार संभ्रमित होऊ शकतात अशी भीती काँग्रेसला आहे. त्या अनुषंगाने भट्टाचार्य यांनी पत्र लिहिले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Avoid #campaigning #Trinamool #SharadPawar #letter, #तृणमूलसाठी #प्रचार #करणेटाळा #शरदपवारांना #पत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये 15 ठिकाणी बॉम्ब हल्ले
Next Article केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?