सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरु झाली आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकाने अहिल्या चौक, भटुंबरे शिवारात ११ लाख १७ हजाराची रक्कम एका वाहनातून घेऊन जात असताना स्थिर सर्वेक्षण पथकाने पकडली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
निवडणूक प्रक्रिया सुरु होताच आचारसंहिता सुरु झाली आहे. यामुळे प्रशासनाकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून रस्त्यारस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. (दि.१६) मार्चला आचारसंहिता लागू झाल्यापासून अशा तपासण्या सुरु झालेल्या आहेत.
पुणे येथून येणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या वाहनातून ११ लाख १७ हजारांची रोकड स्थिर सर्वेक्षण पथकास आढळली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सध्या सोलापूर जिल्ह्यात लागू झाली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास ११ लाख १७ हजार रुपयांची रोकड सापडली आहे.
निवडणूक क्षेत्र असणाऱ्या परिसरात आचारसंहिता लागू असते, अशा परिसरात बेहिशेबी रोख रक्कम घेऊन प्रवास करणे. हे निवडणूक आयोगाच्या नियमास धरून नाही. तालुक्यातील अहिल्या चौकात
येथील स्थिर सर्वेक्षण पथकाने पुणे येथील व्यापारी आपल्या वाहनातून ११ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना आढळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्या संबंधित इसमाकडे आयोगाकडून तपासणी व चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने सदरची रक्कम ताब्यात घेतली आहे. अहिल्या चौकात तपासणी दरम्यान या वाहनातून ही रक्कम सर्वेक्षण पथकाच्या हाती लागली आहे. रात्री सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या या तपासणीत ही रक्कम हाती लागली आहे. ही रक्कम कोठून आणली, कोठे घेऊन चालले आहेत, याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिक तपासणी सुरू आहे.