मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरुन शिवसेना एकाकी पडली असून काँग्रेस या मुद्यावर अलिप्त आहे. तर राष्ट्रवादी हात वर करत असल्याचे दिसत आहे. राज्यात नवी समीकरणे येणार का? अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. भेटीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या दोन्ही नेत्यांची आज सकाळी भेट झाली. भेटीच नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. प्रवीण दरेकर यांचं सरकारी निवासस्थान अवंती येथे जाऊन रोहित पवार यांनी ही भेट घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. रोहित पवार यांचं त्यासंबंधित काही काम होतं का असा प्रश्न आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संबंध राज्याला माहिती आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
अशा परिस्थितीत रोहित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने अनेक तर्क लढविले जात आहेत. तसे पाहता रोहित पवार हे विविध पक्षातील नेत्यांना भेटत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा देशाला माहिती आहे. त्याचीही प्रचिती यानिमित्ताने आली आहे. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी या मतदारसंघातील विकासकामांच्या निमित्ताने राजकारण्यांसोबत सेलिब्रिटींच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या.