Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे आढळला, त्या ठिकाणी आणखी एक प्रेत सापडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे आढळला, त्या ठिकाणी आणखी एक प्रेत सापडले

Surajya Digital
Last updated: 2021/03/20 at 2:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता, त्याच ठिकाणी खाडी किनारी आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ आढळली होती, त्या गाडीचे हिरेन हे मालक होते. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे अटकेत आहेत.


मुंब्रा रेती बंद खाडीजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. काही दिवसांपूर्वी याच खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. आज मुंब्रा रेती बंदर खाडीजवळ जो मृतदेह सापडलाय, त्याची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो ४८ वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलीस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपवण्यात आला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही कार ज्यांच्याकडे होती, त्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याच मुंब्र्याच्या खाडीत त्यांचा मृतदेह सापडला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मृत व्यक्तीचे नाव शेख सलीम अब्दुल असून तो मुंब्रा रेतीबंदरचा रहिवाशी आहे. पेशाने तो मजूर आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास तो तिथे असाच फिरण्यासाठी म्हणून गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरुन तो खाडीत पडला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Maharashtra: A body has been found at the location in Reti Bunder, Mumbra where Mansukh Hiran's body was found a few days back. More detail awaited. pic.twitter.com/g8DxFxpN1m

— ANI (@ANI) March 20, 2021

ही घटना घडल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीतून अब्दुल यांचा मृतदेह बाहेर काढला. अब्दुल यांचा सुद्धा बुडूनच मृत्यू झाला. अब्दुल यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी यामध्ये काही चुकीचे घडले नसल्याचे पोलिसांचे मत आहे. पण शवविच्छेदन अहवालातूनच बऱ्याच गोष्टी समोर येतील.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

TAGGED: #Mansukhhiren #murder #place #otherbody #found, #मनसुखहिरेन #मृतदेह #आढळला #आणखीएकप्रेत #सापडले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तीरथ सिंह रावत यांच्या मुलीनेच घातली फाटकी जीन्स?; काय आहे सत्य
Next Article सचिन वाझेंनी रितेश-जेनेलिया विरोधात भरला होता खटला

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?