मुंबई : सचिन वाझेंनी भारतीय लोकांच्या माहितीसाठी सर्च इंजिन तयार केलं होतं. याद्वारे मोफत व पेड सर्व्हिस देण्यात आली होती. 2012 ला हे लॉन्च करण्यात आलं होतं. Indianpeopledirectory.com नावाने हे सर्च इंजिन तयार करण्यात आलं होतं. नाव, पत्ता, संपर्क आणि पार्श्वभूमी शोधण्यात हे सर्च इंजिन उपयोगी असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, वाझेंनी कॉपीराईट प्रकरणी जेनेलिया आणि रितेश देशमुख विरोधात खटलाही भरला होता.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले होते. २०१४ मध्ये रितेश देशमुख याचा ‘लय भारी’ हा सिनेमा आल्यानंतर त्या शब्दाला आक्षेप घेत वाझे यांनी आक्षेप घेतला होता. सिनेमात लय भारी शब्दाचा प्रयोग केल्याने तब्बल पाच कोटींचा दावा ठोकला होता. मात्र, न्यायालयाने वाझे यांना फटकारले होते.
वाझे यांनी आक्षेपात म्हटले होते, २०१० मध्ये ‘लय भारी’, ‘लय भारी डॉट कॉम’, ‘लयभारी’ या शब्दांचा कॉपीराईट घेतला होता. याचा सिनेमात वापर केल्यामुळे कॉपीराइटचा भंग झाला असून त्यापोटी ५ कोटी रुपये द्यावेत, असे नोटिशीत म्हटले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाझे यांनी याप्रकरणी जेनेलिया देशमुख, निर्माता अमेय खोपकर, जितेंद्र ठाकरे, दिग्दर्शक निशिकांत कामत यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी विनंतीही त्यांनी एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन लिमिटेड, मुंबई फिल्म कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, झी टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड यांनाही केली होती.
‘लय भारी’ हा चित्रपट ११ जुलै, २०१४ रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचा प्रमोशनल व्हिडिओ यू-ट्युबवर प्रसिद्ध झाल्यानंतर वाझे यांनी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकांना कॉपीराइटबद्दल सांगितले. मात्र, त्यांनी फारशी दाद दिली नाही. त्यामुळे वाझे यांनी कोर्टाची पायरी चढत ५ कोटींचा दावा केला होता. पुढे कोर्टाने वाझे यांचे कान टोचत असे शब्द कुणाचे पेटंट अथवा कॉपीराईट असू शकत नाही असे सांगितले होते.