मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणात आपले मत मांडताना सांगितले की महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारने आपल्या कामगिरीने हे सिद्ध केले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे पूर्णपणे गुन्हेगारीकरण झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा शंभर कोटींची वसुली करण्यास सांगितले होते. पोलिसांकडून जबरदस्तीने वसुली करून घेणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही.
भाजपाने आज देशमुख यांच्या पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहेत, असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. आंदोलनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,”मी दोन तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाटील यांनी पुढे सांगितले की आता केवळ अनिल देशमुख यांनी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सरकारला राजीनामा द्यायला हवा. अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शरद पवार सर्वांना ठाऊक होती परंतु सर्व गप्प होते !
पाटील यांनी या प्रकरणात महा विकास आघाडी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सांगितले की महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीएक अधिकार नाही. जर या सरकारमध्ये थोडी जरी लाज बाकी असेल तर संपूर्ण सरकारला राजीनामा देऊन साडेअकरा कोटी जनतेची माफी मागायला हवी.
* उद्धवजी राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेय
माहितीच्या आधारेच सांगितलं होतं की, दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्याप्रमाणे अनिल देशमुखांचा राजीनामा आज घेतला पाहिजे. नीतिमत्तेची चाड असेल, तर उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा घेतील. उद्धवजींना माझं आवाहन आहे की, आमचा विषय नाहीये. शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. जर संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जात आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येकवेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करतेय की, सरकारची प्रतिमा बिघडतेय राठोडांचा राजीनामा घ्या.
* विशेष पुरस्कार दिला पाहिजे
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नांदेड, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. या जल्ह्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांना आटोक्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. राज्य शासनाच्या निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे. या उल्लेखनीय निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री @OfficeofUT आणि आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे ! pic.twitter.com/Xqnnqt6gMt
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 19, 2021
मग मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात नाही का? त्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ देशमुखच नाही तर शिवसेनेचे मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. ते मंत्री कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे मी दोन मंत्री म्हणालो होतो, दुसरे ते आहेत,” असं पाटील म्हणाले.
* ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावं
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत. ते अतिशय निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट झालं आहे की, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे, हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.