मुंबई : एनआयए पोलीस अधिकारी सचिन वाझेंची एक मर्सिडिज ताब्यात घेतली. त्यात रोख रक्कम आणि नोटा मोजण्याची मशीन आढळून आली होती. त्यामुळे वाझेंच्या कारमध्ये नोटा मोजण्याची मशीन कशी काय? असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला. आता परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी एक ट्विट केलं आहे. ‘आता कळलं? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता’, असे सोमय्या म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपली उचलबांगडी झाल्यानंतर दोन- तीन दिवसांनंतर त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याच पार्श्वभूीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची मर्सिडिज ताब्यात घेतली. त्यात काही नंबर प्लेट्स, पाच लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजण्याची मशीन आढळून आली होती. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याची मशिन कशीकाय असा सवाल सर्वांना पडला होता. मात्र परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून सोमय्या यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
अब समझ में आया?
😢
*नोट गिनने वाली मशीन लेकर वाझे क्यों घूम रहा था?*🙄😉 @BJP4India @BJP4Maharashtra— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 20, 2021
आता कळलं का?, वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता , असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सध्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा गंभीर पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
* ठाकरे सरकारने चालढकल थांबवावी
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. “सचिन वाझे, मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी दहशतवादी हल्ल्याची आखणी हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने चालढकल थांबवावी आणि NIA ला सहकार्य करा,” असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
#SachinWaze #MansukhHiren Terror Attack Planned at #Antillia #MukeshAmbani Residence, all these issues are interconnected. #thackeray Sarkar must Stop Stalling Investigation & co-operate NIA to investigate all these Crimes
@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 18, 2021