Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!

Surajya Digital
Last updated: 2021/03/22 at 10:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ज्वाला दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. ‘अरण्य’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात विष्णू विशाल याने याची माहिती दिली. दरम्यान, 2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. परंतू 2011 मध्ये ते एकमेकांपासून विभक्त झाले.

बॉलीवूडमधल्या सेलिब्रेटींच्या नावाची जेवढी चर्चा होते तितक्या प्रमाणात एखाद्या खेळाडूच्या लग्नाची होत नसल्याची चाहत्यांची नेहमीची ओरड असते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे लग्न झाले. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतले. आता अशाच एका भारतीय खेळाडूची गोड बातमी पुढे आली आहे. ती खेळाडू कोण हे जाणून घेऊया.

तुम्हाला बॅटमिंटन विश्वातील ती खेळाडू माहिती असेल, त्याचं काय आहे की, गेल्या वर्षी सात सप्टेंबरला ज्वाला गुट्टा आणि विष्णु विशाल यांनी एक गोड बातमी दिली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यात आम्ही आता लवकरात लवकर लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्या दोघांच्या फॅन्सनं त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या होत्या. याबाबत अधिक माहिती देताना विष्णु यांनी सांगितले की, आम्ही आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत.

N dis happened last nite n what a beautiful surprise it was!
Today when I think of my life what a journey it has been n 2day I realise there is so much more to luk forward to!Towards our family,Aryan,friends and work!its gonna be another great journey am sure ❤️🥂😘 pic.twitter.com/qjqVkK6CWo

— Gutta Jwala 💙 (@Guttajwala) September 7, 2020

मी आता खुपच आनंदित आहे. लग्नाची तारीखही जाहीर करणार आहोत. मी जेव्हा अरण्याची शुटिंग करत होतो तेव्हा ज्वाला ही नेहमीच माझ्यासोबत होती. आम्हाला साथ देणा-या सर्वांचे मनापासून आभारही विष्णुनं यावेळी मानले आहेत.

* चेतन आनंदशी पहिला विवाह

2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. मात्र, दोघांमधील वादामुळे या नात्याला घरघर लागली. आणि त्यांनी त्यापासून फारकत घेतली. ज्वाला आणि चेतन आनंद 2011 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. विष्णू विशाल घटस्फोटित आहे.

2011मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केले होते, परंतु 2018 पासून ते वेगळे राहत आहेत. विष्णू विशाल हा तामिळ अभिनेता आणि निर्माता आहे. त्याचा ‘अरण्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या 26 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Badminton #player #JwalaGutta #get #married #secondtime #soon!, #बॅडमिंटनपटू #ज्वालागुट्टा #लवकरच #करणार #दुसरेलग्न!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पालखी कट्ट्याजवळ भजन करुन वेळापूर ग्रामस्थांनी केला उड्डाणपुलाला विरोध
Next Article मोठेपणा करण्याचा ‘नाद’ आला भाजपच्या ‘अंगलट’, झाली नाचक्की

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?