Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाचा धुमाकूळ, देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

कोरोनाचा धुमाकूळ, देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील

Surajya Digital
Last updated: 2021/03/24 at 7:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यातच दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यात महाराष्ट्र आणि पंजाबचा समावेश आहे. त्यातच सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोल्याचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देशभरात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढत असून परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे सक्रीय रुग्ण 10 जिल्ह्यातच केंद्रीत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये पुणे, नागपूर, मुंबई,ठाणे, नाशिक,संभाजीनगर, बंगळुरू,नांदेड, जळगाव, अकोला यांचा समावेश आहे. यातील तब्बल 9 जिल्हे महाराष्ट्रातील असून एक कर्नाटकमधील आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक असल्याचे आज बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 28 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पंजाबमध्येही दोन हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तेथील लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आरोग्य सचिवांनी सांगितले.

सध्या देशभरात 3 लाख 68 हजार 457 सक्रिय रुग्ण आहेत. 10 राज्यांमध्ये 100 टक्के आरोग्यसेवकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. तसेच 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांनी कोरोनावरील लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण 88 टक्के असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाच्या डबल म्यूटेंट व्हेरिएंटचे प्रमाण वाढत आहे. देशातील 771 रुग्णांध्ये नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्यातील 736 रुग्णांध्ये ब्रिटनचा तर 34 रुग्णांध्ये दक्षिण आफ्रिकेचा व्हेरिएंट आढळल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र, केरळ,तेलंगणा,आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

*  देशातील विविध राज्यातील चोवीस तासातील कोरोनाबाधितांची संख्या

– महाराष्ट्र- 28,699
– पंजाब – 2254
– गुजरात – 1790
– मध्य प्रदेश- 1502
– कर्नाटक- 2000
– तमीळनाडू- 1437
– छत्तीसगड- 1910
– चंदीगड – 214

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #Corona #increase #top10 #inmaharashtra #9city, #कोरोनाचा #धुमाकूळ #देशातील #टॉप10मध्ये #9शहरं #महाराष्ट्रातील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमिर खानमुळे मुख्यमंत्र्यांनाही करावी लागणार करोना चाचणी
Next Article ‘एका व्यक्तीने हे दाखवून दिले तर उमेदवारी अर्ज भरणार नाही’,भालकेंच्या चार दिवसात 55 बैठका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?