Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात खळबळ : लेडी सिंघमची आत्महत्या; आत्महत्या नाही, हत्येचा सूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

महाराष्ट्रात खळबळ : लेडी सिंघमची आत्महत्या; आत्महत्या नाही, हत्येचा सूर

Surajya Digital
Last updated: 2021/03/26 at 1:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अमरावती : मेळघाटच्या हरिसाल येथे वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी अशी ओळख असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (28 वर्षे) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. तस्करांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या दीपाली यांची लेडी सिंघम म्हणून ओळख होती.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण या 28 वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांनी हरीसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काल (25 मार्च) सायंकळी 5.30 च्या सुमारास त्यानी आत्महत्या केली. त्यांच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.

घटनास्थळी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती धारणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दिपाली चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

* दीपाली होती गर्भवती

दीपाली या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी दिपाली चव्हाण यांचा विवाह राजेश मोहिते यांच्याशी झाला होता. राजेश मोहिते हे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात शासकीय सेवेत कार्यरत आहेत. दिपाली या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जायच्या. अवघ्या पाच वर्षांपूर्वीच त्या (2015) साली महाराष्ट्र वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

* आत्महत्या नाही, हत्येचा सूर

दीपाली अतिशय डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा सूर वनविभागात आहे. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवत होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Maharashtra #Sension #LadySingham's #Suicide #Murder #Deepalichawan, #महाराष्ट्रात #खळबळ #लेडीसिंघमची #आत्महत्या #हत्येचा #सूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र हादरला ! रुग्णालयाला भीषण आग, मृतांचा आकडा 10 वर पोहोचला
Next Article दिपालीची आत्महत्या नव्हे हत्याच…?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?