पुणे : तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने 9 बाद 322 धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 50 तर सॅम कुरानने नाबाद 95 धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वरने 3 आणि शार्दूल ठाकूरने 4 विकेट घेतल्या.
यासह भारताने 2-1 च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विराटसेनेने इंग्रजांना विजयासाठी 330 धावांचे आव्हा दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद 95 धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मलानने अर्धशतक झळकावलं. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली. तसेच टी नटराजनने 1 विकेट मिळवली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताने दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचीत केलं. जेसन रॉयने 6 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. जेसन रॉय बाद झाल्यानंतर लगेच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने जॉनी बेयरस्टोला पायचीत केलं.
विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या विकेटनंतर एकामागे एक अशा दोन विकेट गेल्या. कर्णधार विराट कोहली देखील स्वस्तात तंबूत परतला. विराट मोईन अलीच्या फिरकीचा बळी ठरल्याने तो अवघ्या सात धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला.
दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. मात्र, सॅम करनला ही जोडी फोडण्यात यश आलं. सॅमच्या चेंडूवर ऋषभ झेलबाद झाला. त्याने 62 चेंडूत 78 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने अर्धशतक साजरी केलं. पण पुढे बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. हार्दिकने 44 चेंडूत 64 धावा ठोकल्या. यामध्ये 4 षटके आणि 5 चौकारांचा समावेश आहे.