पुणे : पुण्यातील एका लग्न सोहळ्याची चर्चा होत आहे. एक असा लग्नसोहळा सध्या चर्चेत आहे. ज्यात चक्क एका मुलीनेच पतीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. शार्दुल कदम या तरुणाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. समाजात खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी फक्त स्त्रीयांनीच का मंगळसूत्र घालावं, असं म्हणत त्याने लग्नबंधनात अडकत असताना स्वत: मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दूलच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय.
लग्न म्हटलं की नट्टपट्टा, धावपळ, नाच-गाणं, खाणं-पिणं सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवऱ्यासाठी आणि नवरीसाठी हा दिवस त्यांच्या आयुष्यतील एक अविस्मरणीय सोहळा असतो. लग्न सोहळ्यामधील विधींनाही तसचं महत्व आहे. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मुलगा तिला सौभाग्याचं लेणं बहाल करतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळसूत्र हा केवळ एक दागिना किंवा अलंकार नसून मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. मंगळसूत्रातील दोन दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन. आतापर्यंत आपण केवळ विवाहित स्त्रीयांना मंगळसूत्र घातल्याचं पाहिलं असले. किंवा विवाह सोहळ्यात नवरा मुलगा नवरीला मंगळसूत्र घालताना पाहिलं असले.
शार्दुलने लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने मंगळसूत्र घालण्याच्या निर्णयाचा खुलासा केला आहे. ‘मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र म्हणजे आत्मा एक होणारा शुभ धागा. मंगळसूत्राकडे मात्र समाजाकडून वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं हा समाजाचा नियम आहे. पण मला हे खटकतं. मला वाटतं मी माझ्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी मंगळसूत्र घालू शकत नाही का ? आमच्या नात्याचं प्रतिक म्हणून मी हा धागा का घालू नये.’ असं शार्दूल म्हणाला आहे. यांच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.