Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “माझ्या विरोधात एक गँग काम करतीय पण नशिबावर माझा विश्वास”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

“माझ्या विरोधात एक गँग काम करतीय पण नशिबावर माझा विश्वास”

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 11:44 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ऑस्कर विनिंग कंपोजर ए आर रहमान यानं खुलासा केला आहे की, एक गँग त्याच्याविरोधात काम करत आहे आणि अफवा परसवत आहे. हिंदी सिनेमात मला काम मिळत नाही अशा अफवा पसरवल्या जात आहेत असं एआर रहमाननं सांगितलं आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ या सिनेमासाठी एआर रहमान यानंच संगीत दिलं आहे.

आतापर्यंत ए.आर.रेहमान यांनी अनेक गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे. त्यांना आजवर अनेक मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. इतकंच काय तर त्यांनी ऑस्कर पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. परंतु सध्या ऑए.आर.रेहमान चर्चेत आले आहेत. आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, असा आरोप रेहमान यांनी केला आहे. तसंच आपल्याविरोधात अशा उडवल्या जाणाऱ्या अफवांमुळे चित्रपटसृष्टीत कोणीही आपल्याला काम देत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. नुकताच ए.आर.रेहमान यांनी संगीत दिग्दर्शन केलेला दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

एका मुलाखतीत ए आर रहमान याला विचारण्यात आलं की, तुम्ही तमिळ सिनेमांच्या तुलनेत हिंदी सिनेमात कमी काम का करता ? यावर उत्तर देताना ए आर रहमान म्हणाला, ‘मी चांगल्या सिनेमांना नकार देत नाही. परंतु कोणती तरी गँग आहे जी गैरसमजामुळं चुकीच्या बातम्या पसरवत आहे. मुकेश छाबडा माझ्याकडे आल्यानंतर मी 2 दिवसात त्यांना गाणं तयार करून दिलं.’

ए आर रहमाननं पुढं म्हणाला, ‘मुकेश छाबडा मला म्हणाले, सर किती लोकांनी मला सांगितलं तुमच्याकडे नका जाऊ म्हणून. त्यांनी अनेक स्टोऱ्याही ऐकवल्या. मी ते ऐकल्यावर विचार केला आणि म्हणालो, ठिक आहे. आता मला समजलं की, मला कमी काम का मिळत आहे आणि चांगले सिनेमे माझ्याकडे का येत नाहीयेत.’

रहमाननं सांगितलं की, ‘मी डार्क सिनेमे करतो. कारण एक ग्रुप माझ्या विरोधात काम करत आहे. त्यांना कळत नाहीये की ते माझं नुकसान करत आहेत. काही लोकांना वाटतं मला काम मिळू नये. ठिके आहे. मी नशिबावर विश्वसास ठेवतो आणि मला असं वाटतं की, तुमच्याकडे सारं काही देवाकडून येतं, त्यामुळे मी माझे चित्रपट व काम करत आहे. सुंदर चित्रपट बनवा व तुमचे माझ्याकडे स्वागत आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #एआररहेमान #आरोप #विश्वास #नशीब #गँग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील पहिलीच कारवाई; ठाण्यातील खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द
Next Article गृहमंञ्यांच्या हस्ते कसरतपटू शांताबाई पवारांना साडीचोळीसह लाखाची मदत; काय आहे हा विषय वाचा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?