मुंबई : परभणीतील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले. या पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासोबत आज पत्रकार परिषद घेतली. “पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार केले गेले. तक्रार करुन देखील गुन्हा दाखल झाला नाही, आता विटेकरांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा,” असे देसाई यांनी म्हटले आहे.
परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माझे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. मी तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असं राजेश विटेकर म्हणतात” असा दावा पीडितेने केला आहे. राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला.
* बलात्काराचे आरोप झालेले राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर कोण आहेत?
> राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
> सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आहेत.
> परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आहेत.
> परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले. शिवसेनेच्या संजय जाधवांकडून पराभव झाला. तेव्हा 4 लाख 96 हजार 742 मतांनी ते दुसऱ्या क्रमांकावर होते.
> 5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे.