मुंबई / नागपूर : 1 एप्रिल आज राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. नागपुरात आज दिवसभरात 3 हजार 630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 2 हजार 928 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, कोरोनामुळे आज 60 रुणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृतांचा आकडा 5 हजार 158 वर गेला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 71 लाख 3 हजार 875 झाली आहे. त्यातील 2 कोटी 33 लाख 2 हजार 453 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

– नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे 60 जणांचा मृत्यू
– दिवसभरात 3630 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– आज दिवसभरात 2928 जणांनी केली कोरोनावर मात
– एकूण रुग्ण संख्या – 229668
– एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 184537
– एकूण मृतांचा आकडा 5158 वर
