सोलापूर : घाण पाण्याच्या विहिरीत दोन पोत्यांमध्ये दोन तुकड्यांत असलेल्या स्थितीतील एक मृतदेह कर्नाटक पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला. हिरोळी (ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक) येथील 40 वर्षीय व्यक्तीचा खून करून मृतदेह घाण पाण्याच्या विहिरीत टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आळंद पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर एस. मंजुनाथ यांनी ही महिती दिली.
नागप्पा अंदप्पा वाडेद (वय 40, रा. हिरोळी, ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव
आहे. संशयित आरोपीचे नाव मल्लिनाथ वाडेद (वय 38) व इतर पाच संशयित आहेत. संशयितांपैकी तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, दोघे संशयित फरार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संशयित आरोपी मल्लिनाथ वाडेद हा अक्कलकोट येथील एकाच्या शेतामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रोजंदारीवर काम करीत होता. मृत नागप्पा याच्या पहिल्या बायकोचा मृत्यू झाला होता. मृत नागप्पास तुझे लग्न लावून देतो म्हणून संशयित आरोपींनी बोलावून घेतले. त्याचा कुऱ्हाडीने मारून खून केला. दोन तुकडे करून मृतदेह पोत्यात घालून घाण पाण्याच्या विहिरीत टाकले.
* शेतीच्या कारणावरून खून झाल्याचा संशय
मृत नागप्पा हरवल्याची केस कर्नाटक राज्यातील मादनहिप्परगा पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी नोंद झाली होती. याचा तपास करताना संशयित आरोपी मिळाले व अक्कलकोट येथे घाण पाण्याच्या विहिरीत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह काढण्यासाठी माजी नगरसेवक सुनील सिद्धे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना मदत केली.
खुनाचे कारण उघड झालेले नसले तरी शेतीच्या कारणावरून खून झाल्याचा संशय कर्नाटक पोलिसांच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याची नोंद मादन हिप्परगा पोलिस स्टेशनमध्ये झाली असून, याची माहिती सर्कल इन्स्पेक्टर एस. मंजुनाथ यांनी दिली.