Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री राम मंदिर भूमिपूजनाविषयी मुख्यमंञी ठाकरेंचाही वेगळाच सल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

श्री राम मंदिर भूमिपूजनाविषयी मुख्यमंञी ठाकरेंचाही वेगळाच सल्ला

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 4:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनामुळं या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिला आहे. हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ‘राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल, अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या मुद्द्याला लढ्याची पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करुन मशीद बांधली होती. त्याठिकाणी आपण पुन्हा मंदिर उभं करतोय. केवळ भारतातील हिंदूंचं नाही तर जागतिक कुतुहलाचा हा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचवले.

* मी जाणार, पण अजून तारीख निश्चित नाही

राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत, असं ठाकरे म्हणाले.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोनिया गांधी स्थलांतरी मजुरांच्या तिकिटाचे पैसे देणार होत्या; त्याचं काय झालं ?
Next Article कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा 4 हजार पार; एकूण कोरोनाबळी 112

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?