Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर पोटनिवडणूक : 11 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पंढरपूर पोटनिवडणूक : 11 जणांची माघार, 19 उमेदवार रिंगणात

Surajya Digital
Last updated: 2021/04/03 at 11:59 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज 11 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज कायम ठेवल्याने आवताडे यांना कुटुंबातील बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे आज निश्‍चित झाले. नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले, मोहन हळणवर आदी 11 जणांनी मात्र अर्ज मागे घेतले असून, 19 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदासंघात निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज, शनिवार,  दिनांक 03 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश आण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर(अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष),संजय चरणु पाटील (अपक्ष),अमोल अभिमन्यु माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे(अपक्ष), रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत सिद्धेश्वर आवताडे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे समाधान आवताडे यांना राजकीय विरोधकांच्या बरोबरच कौटुंबिक बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 21 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.

मतदान शनिवार दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी रविवार दिनांक 02 मे 2021 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #पंढरपूर #11जणांची #माघार #19उमेदवार #रिंगणात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजूबा! मानवी इतिहासात पहिल्यांदाच तीन लिंगांसह मुलाचा जन्म
Next Article सोलापूरच्या अश्विनी कणेकर गेट परीक्षेत देशात प्रथम

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?