मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. तसेच यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंबद्दल वाढत्या कोरोनाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.
Rashmi Thackeray, wife of Uddhav Thackeray, admitted to HN Reliance hospital in South Mumbai.
She was tested Covid19 positive on March 23.UT can't protect his wife from corona then how entire Mumbai is safe?
Why isn't she got admitted to Cooper Hospital ? pic.twitter.com/M8FeI235UX
— Nitika Singh🦋🇮🇳 (@itsNitikaSingh) March 31, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. तसेच यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंबद्दल वाढत्या कोरोनाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली.
कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? तेच कळलं नाही – फडणवीस https://t.co/FnGIJhSkDB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 3, 2021
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोललं जात आहे.