कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल शनिवारी रात्रीपर्यत नव्या कोरोना रूग्णांची संख्या 406 वर पोहोचली. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 57 झाली आहे. शनिवारी दिवसभरात 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळीची संख्या 112 झाली आहे.
शनिवारी सकाळपर्यत 388 रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 634 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 2 हजार 393 जण आयसोलेटेड केले आहेत. सकाळपर्यत 484 स्वॅब रिपोर्ट आले. त्यामध्ये 71 पॉझिटिव्ह आहेत तर 356 निगेटिव्ह आहेत. शहरात 15 पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने दिसून आले आहेत. त्यामध्ये सायंकाळपर्यत 60 हून अधिक रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
जिल्ह्यात काल शनिवारी कोरोनाने बळी गेलेल्या मध्ये चंदगड तालुक्यातील 64 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील वाकरे येथील 65 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी लालनगर येथील 60 वर्षीय पुरूषाचा, कबनूर जयहिंद नगर येथील 46 वर्षीय पुरूष आणि जुना चंदूर रोड येथील 69 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील 65 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात तर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथील 68 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.
दरम्यान, सायंकाळपर्यत आणखी दोघांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजी येथील 94 वर्षीय वृद्ध आणि पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील 83 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.