नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतही कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासूनच नाईट कर्फ्यू लागणार आहे. कफ्फ्यूची वेळ रात्री १० वाजता पासून पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. ज्या परिसरात ३ पेक्षा जास्त रुग्ण आढळतील त्या परिसराला मायक्रो- कन्टेनमेंट झोन बनवण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे.
हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते – दिया मिर्झा https://t.co/mtYEBBt0sn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
राजधानी दिल्लीत करोना संक्रमणाची वाढती संख्या ध्यानात घेता केजरीवाल सरकारनं आजपासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केलीय. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत ३० एप्रिलपर्यंत रात्री १०.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू राहील.
यासोबतच, दिल्लीत करोना लसीकरण मोहीम २४ तास सुरू राहील, अशी घोषणाही सरकारकडून करण्यात आलीय. त्यामुळे आपली वेळ निश्चित करण्यासाठी तसंच नाईट कर्फ्यूमध्येही नागरिकांना ई-पासद्वारे सूट मिळवता येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य, आपत्ती निवारण, पोलीस, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, जिल्हा प्रशासन, लेखा, वीज विभाग, पाणी व स्वच्छता तसंच हवाई मार्ग – रेल्वे – बसशी संबंधित सरकारी अधिकारी, दिल्ली सरकारचे अधिकारी आणि स्वायत्त संस्था व महामंडळाचे सर्व कर्मचारी यांना नाईट कर्फ्यूमध्ये सूट देण्यात येणार आहेत. याशिवाय रेशन, किराणा, फळ भाज्या, दूध, औषधं यांच्याशी निगडीत दुकानदारांना ई-पास द्वारे येण्या-जाण्यासाठी परवानगी दिली जाईल.
एमपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच
https://t.co/9bdMQqWNQ5— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
पत्रकारांनाही ही सूट मिळेल परंतु, यासाठी त्यांना ई-पास घेणं गरजेचं असेल. नियमानुसार, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ई-पासद्वारे ही परवानगी देण्यात येईल. तसंच आयडी कार्ड दाखवल्यानंतर खासगी डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफलाही सूट मिळेल. नाईट कर्फ्यू दरम्यान रस्ते वाहतुकीवर मात्र कोणतीही बंदी नाही. लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना सूट दिली जाईल परंतु यासाठी त्यांच्याकडे ई – पास असणं आवश्यक राहील.