कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोना संकट वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत परीक्षा होणार होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा स्थगित केल्याचे पत्रक जारी केले आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकट वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत परीक्षा होणार होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा स्थगित केल्याचे पत्रक जारी करण्यात आलं आहे.
एमपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच
https://t.co/9bdMQqWNQ5— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश काढले आहेत. रिपोर्ट नसतील तर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. इतर जिल्ह्यातील प्रादूर्भाव पाहता कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी कडक सूचना दिल्या आहेत.