मुंबई : अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे.
वाझे अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मोठी घोषणा, रिलायन्स जिओ व एअरटेलमध्ये करार #jio #airtel #surajyadigital #एअरटेल #जिओ #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/800OpCZQwT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिलं आहे. “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.
वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याबरोबरच राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. अनिल परब बृहन्मुंबई महापालिकेशी संलग्नित असलेल्या ५० कंत्राटदारांकडून २ कोटीची गोळा करण्यास सांगितलं होतं, असंही वाझे यांनी एनआयएला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आज जागतिक आरोग्य दिन, सलाम त्या सर्व कोरोना योद्ध्यांना #surajyadigital #योद्धा #आरोग्यदिन #जागतिक #सलाम #सुराज्यडिजिटल #कोरोना #HealthDay pic.twitter.com/em6ygpirw1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
* सचिन वाझेंच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ
सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे. NIA कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार आहे. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.