मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातच आता लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

* आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय – अजित पवार
आता प्रत्येक शहरासाठी वेगळा निर्णय नसेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनसंदर्भात त्यांनी पुण्यात हे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक आहे. यामध्ये कडक लॉकडाऊन करायचा का ? यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1380779954166591491?s=19
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात चर्चा केली जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1380845743540371459?s=19
या बैठकीत राज्यात तीन आठवड्याच्या लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जर हा लॉकडाऊन लावण्यात आला तर मग नियमावली गाईडलाईन्स कशा प्रकारे करायच्या, याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1380854283789209605?s=19
कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेक लोक बाधित होत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तेवढा अवधी देण्याची गरज आहे. त्यामुळेच लॉकडाऊन कसा अपरिहार्य आहे, हे विरोधकांना समजावून सांगण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण कसं आणता येईल? विरोधी पक्षांच्या याबाबत काय सूचना आहेत? हे जाणून घेण्यासाठीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
