नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
शरद पवारांची सोलापूरसाठी 75 रेमडेसिविर इंजेक्शनची मदत https://t.co/ADoHB1els8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
तसेच रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या सर्व कंपन्यांना केंद्र सरकारने इंजेक्शनविषयीची सर्व माहिती त्यांच्या वेबासाईटवर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व रेमेडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर इंजेक्शनची उपलब्धता, त्याचा पुरवठा तसेच वितरक यांची सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करुन द्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच, ड्रग्ज इन्स्पेकटर्स आणि संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचेसुद्धा केंद्र सरकारने निर्देशित केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता देशातील रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
CSK ला मोठा दणका; कर्णधार धोनीला 12 लाखांचा दंड https://t.co/1xWHb5ZnHv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.