उस्मानाबाद : राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार सरकार करत असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये सलून आणि पार्लर बंद करण्यात आली आहेत. याचा फटका अनेक सलून चालकांना बसत असून उस्मानाबादेत एका सलून चालकाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील पीएसआय मोहन दगडे यांचे कोरोनामुळे निधन https://t.co/KU4lwlEpB7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
आर्थिक अडचणीला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावातील सलून चालकाने विष घेऊन आत्महत्या केली आहे. मनोज दगडू झेंडे ( वय 45) असे आत्महत्या केलेल्या सलून चालकाचे नाव आहे. ‘आमची दुकाने बंद आहेत, सरकारचा चुकीचा निर्णय आहे, माझ्या लहान लेकरांचे मी 5 हजार रुपयात कसे भागवायचे,’ अशी चिठ्ठी झेंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली आहे.
पाया पडतो, लॉकडाऊन नको; अन्यथा औषध पिणार #surajyadigital #lockdown #लॉकडाऊन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/GhmdTcwoBu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
त्यांच्या पश्चात 2 मुले व एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. मुलीचे लग्न झाले आहेत तर एक मुलगा 17 वर्ष तर दुसरा 12 वर्षांचा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुसाईड नोटमध्ये मनोज झेंडे यांनी लिहिलें की, माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे.
भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण https://t.co/ZNPJiCYbdw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही 5 हजार रुपयांवर घर कसे चालवायचं, असा सवालही मनोज झेंडे यांनी नोटमध्ये केला आहे.