Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढा तालुक्यात आज 15 रुग्णांची वाढ; कुर्डूवाडी शहरासह रिधोरे बनतेय कोरोना हाॅटस्पाॅट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माढा तालुक्यात आज 15 रुग्णांची वाढ; कुर्डूवाडी शहरासह रिधोरे बनतेय कोरोना हाॅटस्पाॅट

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 10:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

माढा : माढा तालुक्यात आज रविवारी एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कुर्डूवाडी शहर आणि रिधोरे या तालुक्यातील गावे कोरोना हाॅटस्पाॅट बनू पाहत असल्याने प्रशासनासह तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

आजच्या कुर्डूवाडी शहरातील 8 आणि रिधोरे गावातील 7 व्यक्तींच्या समावेशाने तालुक्यात 119 कोरोनाबाधित झाले आहेत. एकट्या रिधोरे गावात आज अखेर 45 रुग्णांची संख्या झाली आहे. यामुळे हाॅटस्पाॅट बनलेल्या या गावात उद्या सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह आरोग्य विभाग पंचायत समिती विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन विशेष मोहीम हाती घेणार आहेत.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

यामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अॅटिजन टेस्ट घेतल्या जाणार आहेत. एकूणच कोरोनाची गावातील साखळी तोडण्यासाठी 10 दिवस पूर्णतः गाव बंद करण्याच्या तयारीत असल्याचे गटविकास अधिकारी डाॅ. संताजी पाटील यांनी सांगितले.

आजपर्यंत 485 जणांची रॅपिड अॅटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 31 अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. स्वॅब पाठवलेल्या रुग्णांची संख्या 411 आहे. आतापर्यंत 42 रूग्ण बरे होऊन कुर्डूवाडी कोविड हेल्थ सेंटरमधून घरी गेले आहेत.आतापर्यंत तालुक्यात 3 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहेत.

आजही माढा तालुकयातील 74 जण कुर्डूवाडी हेल्थ सेंटरसह सोलापूर बार्शी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी डाॅ पाटील यांनी दिली. कुर्डूवाडी सेंटरमधून आज तीन जण बरे झाल्याने घरी सोडले. यावेळी त्यांना सेंटरमधून पुष्पगुच्छ देत इतर रूग्णांनी निरोप दिला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #माढा #कुर्डूवाडी #रिधोरे #हॉटस्पॉट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article …अडचणी पाहता बकरी ईदला सोलापुरात बकरी खरेदी – विक्रीला परवानगी द्यावी
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये सहा मृत्यू तर नव्याने 154 नवीन बाधित रुग्ण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?