सोलापूर / पंढरपूर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ उल्लेख करण्यावरुन आक्षेप नोंदवत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना इशारा दिला आहे. अजित पवार यांनी पंढरपुरात सभेत बोलताना पुन्हा एकदा ‘चंपा’असा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांना डिवचलं होतं.
पुण्यात रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन https://t.co/zABRS6aXPS
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
अजित अनंतराव पवार म्हणजे ‘अअप’ तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे ‘चंपा’ असा शॉटफॉर्म होतो, असा टोला त्यांनी लगावला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संताप व्यक्त केला आहे.
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज #sharadpawar #शरदपवार #discharge #डिस्चार्ज #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/vPyd3yIViv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
“अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
"हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी" https://t.co/MGo6amzmq1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
सरकार पडणार नाही असं अजित पवारांना सारखं का सांगावं लागतं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकार पडणार नसल्याचा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता? आम्ही काही सत्ताबदलाची आस लावून बसलेलो नाही. पण राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन, असा इशारा त्यांनी दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी आलेले अजित पवार अनेकदा भाजपला लक्ष्य करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पाडणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्ला चढवत आहेत. अजित पवारांकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. हा अजित पवारांचा स्वभाव नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.
ही भाषा बरोबर नाही, अजित पवारांवर एम फिल कराव लागेल #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #bjp #ncp #पंढरपूर #निवडणूकhttps://t.co/v9nExInoWW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
‘अजित पवारांना काय झालंय माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. कारण इतकं सगळं करूनही ते छातीठोकपणे बोलत आहेत. त्यांची सिंचन प्रकरणी चौकशी सुरू आहे. बँक घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आहे. राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत येतात आणि अजित पवार ते खरेदी करतात. अजित पवारांचे नेमके किती साखर कारखाने आहेत, हे त्यांनी एकदा सांगावं,’ असं पाटील म्हणाले.
पोलिसाने पत्नीला जाळून मारण्याचा केला प्रयत्न, भाजलेल्या अवस्थेतही दोन दिवस बंदिस्त https://t.co/fwWy6sO6nK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
‘सत्तेत असलेल्या व्यक्तीनं नम्र राहावं. पण अजित पवार नाक वरून चालत आहेत. सरकार कोणाचंही असलं तरी हेच उपमुख्यमंत्री होतात आणि इतकं सगळं करूनही ते अशी विधानं करतात. या सगळ्यासाठी हिंदीत ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ अशी एक म्हण आहे. कालचक्र सतत फिरत असतं. त्यामुळे अजित पवारांनी फार गमजा मारू नयेत. त्यांनी नीट बोलावं,’ असा इशारा पाटील यांनी दिला.